मुंबई । राज्यात गेल्या काही वर्षांपासून अव्वाच्या सव्वा वीज बिल भरून जनतेचे कंबरडे मोडली असून मात्र आता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीनं पहिल्यांदा ग्राहकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. महावितरणकडून पहिल्यांदाच दर कपातीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावात साधारणपणे 1 ते 15 टक्के कपात अपेक्षित आहे. या निर्णयाचा लाभ महाराष्ट्रातील 2 कोटी वीज ग्राहकांना होणार आहे.
महावितरणनं यासंदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र वीज नियामक आयोगाला दिला आहे. 2025-26 ते 2029-30 या कालावधीमध्ये 12 टक्के ते 23 टक्के दर कपातीचा प्रस्ताव आहे. 2025-26 या वर्षामध्ये जे घरगुती वीज ग्राहक 100 यूनिट पेक्षा कमी वीज वापरतात त्या मध्ये 15 टक्के कपातीचा प्रस्ताव आहे. यामध्ये पुढं 2027-28 मध्ये 19 टक्के तर 2028-29 मध्ये 25 टक्क्यांपर्यंत घट अपेक्षित आहे. या ग्राहकांना सध्या एका यूनिटला 5.14 रुपये द्यावे लागतात 2029-30 मध्ये त्यांना एक यूनिट वीज 2.20 रुपयांना मिळेल.
जे ग्राहक 101-300 यूनिट वीज वापरतात. घरगुती वीज ग्राहकांची संख्या यामध्ये मोठी आहे. सध्या या वीजग्राहकांना एका यूनिटला 11.06 रुपये द्यावे लागतात, दरकपातीच्या प्रस्तावानंतर त्यांना 2030 मध्ये एक यूनिट वीज 9.30 रुपयांना उपलब्ध होईल. जे ग्राहक 301 -500 यूनिट वीज प्रतिमहिना वापरतात त्यांना एका यूनिटला 15.60 रुपये द्यावे लागतात. 2029-30 मध्ये त्याचा दर 15.29 रुपये प्रति यूनिट असेल. 500 यूनिट पेक्षा जे अधिक वीज वापरतात त्यांच्यासाठीचा सध्याचा प्रति यूनिट दर 17.76 रुपये आहे तो पाच वर्षानंतर 17.24 रुपये असेल.
1 एप्रिल पासून वीज दर कपातीचा निर्णय लागू होऊ शकतो. वीज बिलामध्ये पुढील पाच वर्ष 12 ते 23 टक्के कपात होऊ शकते, असं महावितरणकडून सांगण्यात आले आहे.
Discussion about this post