महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अर्थात महावितरणकडून भरती निघाली आहे. महावितरण गोंदिया कार्यालयातही भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे.
इंजिनियरिंग अप्रेंटिस पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. २१ जागांसाठी ही भरती होणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा केलेला असावा. या नोकरीसाठी १८ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.
ज्या तरुणांचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहेत आणि नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. गोंदिया येथे नोकरीचे ठिकाण असणार आहे.
या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला nats.education.gov.in या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करायची आहे. त्यानंतर नोंदणी करायची आहे.त्यानंतर आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज जमा करायचा आहे. ९ सप्टेंबरपूर्वी तुम्ही अर्ज करायचा आहे.
Discussion about this post