नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे डिप्लोमा आणि पदवीधर असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.
या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष बाब म्हणजे थेट लातूर येथे नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी होत आहे.
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. 1 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत. 27 फेब्रुवारी 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना अर्ज हे करावे लागणार आहेत.
आवश्यक पात्रता :
ही भरती प्रक्रिया 26 जागांसाठी पार पडत आहे. संबंधित ट्रेडमध्ये उमेदवाराकडे अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा किंवा पदवी असणे आवश्यक आहे.
उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असला तरीही ऑनलाईन अर्जाची प्रत ही महावितरण कार्यालय लातूर झोन येथे पाठवावी लागणार आहे. यासोबत आपला फोन नंबर आणि ईमेल आयटी देखील द्यावा लागणार आहे.
परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 फेब्रुवारी 2024 ही आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे लागणार आहे. थेट महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. चला तर मग लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Discussion about this post