जळगाव । देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून यादरम्यान राजकीय नेत्यांमध्ये टीका-टिप्पणी आणि आरोप प्रत्यारोपांचे वारे वाहू लागेल आहेत.दरम्यान, भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. देशात ज्याप्रमाणे इंडिया आघाडीची परिस्थिती झाली तशीच राज्यात महाविकास आघाडीची परिस्थिती होणार असल्याचं महाजन म्हणाले. तसेच येत्या ८ ते १५ दिवसात महाविकास आघाडीला आणखी धक्के बसणार असल्याचे भाकीत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
धुळ्यात मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना भाजपचे उमेदवार सुभाष भामरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. भाजपतर्फे आयोजित या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये धुळे लोकसभा मतदारसंघातील बहुतांश कार्यकर्ते उपस्थित असल्याचे बघावयास मिळाले.
दरम्यान, यावेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, गेल्या वेळचे सर्व रेकॉर्ड तुटतील यावेळी आमचा विक्रमी आकडा असेल. पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला.
तसेच येत्या ८ ते १५ दिवसात महाविकास आघाडीला आणखी धक्के बसणार असल्याचे भाकीत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणाला राहायची इच्छा नाही, त्यांना सर्वांना मुख्य प्रवाहात यायचं असल्याचं मत व्यक्त करत मंत्री गिरीश महाजन यांनी पुढील काही दिवसात महाविकास आघाडीला आणखी धक्के बघावयास मिळतील, असा दावा गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.















Discussion about this post