जळगाव : महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भातील महत्वाची अपडेट समोर आली आहे. महाविकास आघाडीमध्ये जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागांचा तिढा संपला जळगावची जागा शिवसेना ठाकरे गट तर रावेरची जागा राष्ट्रवादी शरद पवार गट लढविणार आहे. पुण्यात झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
लोकसभेच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरु होती. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना ठाकरे गटाकडूनदेखील दावा केला जात होता. यासाठी मविआच्या नेत्यांच्या अनेक बैठका झाल्या. मात्र, तोडगा निघाला नव्हता, अखेर जिल्ह्यातील दोन्ही जागांचा तिढा संपला असून, आता जळगावची जागा ठाकरे गटाच्या तर रावेरची जागा शरद पवार गटाच्या वाट्याला गेली आहे.
महाविकास आघाडीतील जिल्ह्यातील दोन्ही जागांचा तिढा संपला आहे. मात्र, या दोन्ही जागांवर मविआचे उमेदवार कोण..? याकडे लक्ष लागले आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून डॉ. हर्षल माने, गुलाबराव वाघ, कुलभुषण पाटील यांची नावे चर्चेत आहेत. तर रावेरमध्ये आमदार एकनाथ खडसे हे डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच निवडणूक लढवतील
Discussion about this post