मुंबई : राज्यात एकीकडे शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल आज लागणार असून या निकालाकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. त्यातच महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
महाविकास आघाडीचं आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. विशेष म्हणजे दिल्लीत याबाबत प्रचंड खलबतं झाली. त्यानंतर सर्वानुमते याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यावेळी दोन-तीन जागा वगळता सर्व जागांवर तीनही पक्षांचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वाधिक जागा दिल्या जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना समसमाना जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर जागावाटपाच्या मुद्द्यावर आता तीनही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होण्याची शक्यता कमी आहे. आता फक्त दोन-तीन जागांबाबत अजून एकमत झालेलं नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.















Discussion about this post