मुंबई । विधानसभेच्या अर्थसंकल्पयीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी नाव निश्चित झाले आहे. विधानसभा विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाला मिळणार असल्याची माहिती समोर आलीय. विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचं नाव जवळपास निश्चित झालंय. विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेना दावा करणार असून, तशा आशयाचं पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात येणार आहे. तर, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस आग्रही असल्याची माहिती आहे.
खरंतर विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेले संख्याबळ महाविकास आघाडीतील तीनही पक्षाकडे नाहीत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कमी जागा आल्या होत्या.
त्यामुळं विधानसभा विरोधीपक्षनेत्याचा निर्णय झाला नव्हता. मात्र, आता ठाकरे गटाच्या वतीनं विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात येत आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या नावावर जवळपास शिक्कमोर्तब करण्यात आलं आहे. भास्कर जाधव हे आक्रमक नेते असून ठाकरेंना याचा फायदा नक्कीच होईल. मात्र, यावर अंतिम निर्णय राहुल नार्वेकर घेतील, अशी माहिती आहे.
Discussion about this post