नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाट्रान्स्कोमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. १०वी पास तरुणांसाठी महाट्रान्स्को पुणे विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटडेमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ६८ रिक्त पदांवर ही भरती करण्यात येणार आहे. महाट्रान्स्कोमधील या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
महाट्रान्स्को पुणे येथे अप्रेंटिस/ इलेक्ट्रिशियन पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमधून आयटीआय उत्तीर्ण असावे.
महाट्रान्स्कोमधील या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४, २५ आणि ३१ ऑक्टोबर आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेतदेखील भरती सुरु आहे. निरीक्षक या पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. १७८ रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर झाली आहे. या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना कर निर्धारण आणि संकलन खात्या ग्रुप सी निरीक्षक पदावर काम करावे लागणार आहे.















Discussion about this post