महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या कंपनीच्या अंतर्गत एकूण 7 परिमंडल कार्यालये (अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी) व राज्य भार प्रेषण केंद्र, ऐरोली हे कार्यालय आहे. त्यापैकी 7 परिमंडल कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळी मंडल कार्यालये आहेत. त्या त्या मंडल कार्यालया अंतर्गत येणा-या वेतनगट ३ मधील निम्नस्तर लिपीक (वित्त व लेखा) ची 0260 रिक्त पदे एकत्रित करून अनुशेषाप्रमाणे सरळसेवेद्वारे भरणे करीता अर्हतापात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत.
या भरतीप्रक्रियेला सुरुवात झाली असून पात्र उमेदवारांनी कंपनीच्या www.mahatransco.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. 10 मार्च रोजी ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची शक्यता. या भरती द्वारे एकूण 260 जागा रिक्त आहेत त्यामुळे पदवी पात्र उमेदवारांना नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे.
पदाचे नाव : निम्नस्तर लिपीक (वित्त व लेखा)
पात्रता काय?
वाणिज्य शाखेतील पदवी (बी कॉम)
वेतन : 34,555 ते 86,865 रूपये. मुळ वेतनाव्यतिरिक्त महागाई भत्ता, घरभाडे भत्ता वगैरे भत्ते कंपनीच्या नियमाप्रमाणे लागु राहतील.
वयाची अट : 18 ते 38 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील. (सिथीलतेसाठी जाहिरात वाचा.)
शुल्क :
1) खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 600 रूपये.
2) अनुसूचित जातीतील उमेदवारांसाठी – 300 रूपये.
Notification : PDF
Discussion about this post