राज्य सरकारच्या महापारेषणमधील नोकरीची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत असलेल्या उमेदवारांसाठी एक गुडन्यूज आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने काही पदे भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. एकूण 2541 जागा या भरतीद्वारे भरल्या जाणार आहे. आयटीआय पास असलेल्या उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी आहे.
या पदांसाठी होणार भरती
विद्युत सहाय्यक (पारेषण) 1903 पदे
वरिष्ठ तंत्रज्ञ 124 पदे
तंत्रज्ञ 1 200 पदे
तंत्रज्ञ 2 314 पदे
आवश्यक पात्रता?
विद्युत सहाय्यक (पारेषण) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली अंतर्गत वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहेत. उमेदवारांकडे तसे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारांला संबंधित कामाचा अनुभव असणे
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. यासाठी 20 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना 10 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या.
विद्युत सहाय्यक (पारेषण), सिनिअर टेक्निशियन, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. अर्जात काही त्रुटी असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्या. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
वेतनश्रेणी :
विद्युत सहाय्यक (पारेषण) अ) प्रथम वर्ष – एकत्रित मानधन रुपये १५०००/- दरमहा
ब) द्वितीय वर्ष – एकत्रित मानधन रुपये १६०००/- दरमहा
क) तृतीय वर्ष एकत्रित मानधन रुपये १७०००/- दरमहा
वरिष्ठ तंत्रज्ञ – रु. ३०८१०-१०६०-३६११०-११६०- ४७७१०-१२६५-८८१९०
तंत्रज्ञ 1 – रु. २९९३५-९५५-३४७१०-१०६०- ४५३१०-११६०-८२४३०
तंत्रज्ञ 2 – रु.२९०३५-७१०- ३२५८५-९५५-४२१३५- १०६०-७२८७५
Discussion about this post