Thursday, August 7, 2025
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

नऊ मह‍िन्यात ६ लाख नागर‍िकांना द‍िले महसूल प्रशासनाने  घरबसल्या ड‍िज‍िटल दाखले ! सात मह‍िन्यात ८३ हजार जातीच्या दाखल्यांचे व‍ितरण

जनबंधू लाईव्ह न्यूज टीम by जनबंधू लाईव्ह न्यूज टीम
January 3, 2024
in जळगाव जिल्हा
0
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
बातमी शेअर करा..!

नागर‍िकांना चकरा न मारता वेळेत कागदपत्र म‍िळाल्याने झाला फायदा ; दररोजच्या जात प्रमाणपत्र वाटपाच्या सरासरीत वाढ

जळगाव : ज‍िल्ह्यातील महसूल प्रशासनाच्या वतीने सर्वसामान्य जनतेला आवश्यक असलेले विव‍िध दाखले, कागदपत्रांचे सेतू सेवा केंद्र, आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून व‍ितरण करण्यात येत असते. ज‍िल्ह्यातील १२०९ सेतू केंद्र व आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून मागील ९ मह‍िन्यात नागर‍िकांना आवश्यक असलेले ५ लाख ८१ हजार ९०३ दाखल्यांचे ऑनलाईन व‍ितरण केले आहे. महसूल प्रशासनाने ड‍िज‍िटल पध्दतीने हे दाखले व‍ितर‍ित करतांना यामध्ये पारदर्शकता, अचूकता ठेवत नागरिकांना थेट घरबसल्या दाखल्यांचे व‍ितरण केले आहे. महसूल प्रशासनाने जलद प्रशासनाचा वस्तूपाठच घालून द‍िला आहे.

ज‍िल्ह्यात सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र, नॉन क्रीमील‍ियर प्रमाणपत्र, वय, राष्ट्रीयत्व व अध‍िवास प्रमाणपत्र, अल्पभूधारक दाखला, भूम‍िहीन प्रमाणपत्र, तहसील कार्यालयाचे सर्टीफाईड प्रमाणपत्र, डोंगरी प्रमाणपत्र, शेतकरी प्रमाणपत्र, सर्वसाधारण प्रत‍िज्ञापत्र, उत्पन्न दाखला, रह‍िवास दाखला, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र व ऐपत प्रमाणपत्र आदी दाखल्याचे नागर‍िकांना घरबसल्या व‍ितरण करण्यात येत असते. नागर‍िक गावा – गावात कार्यरत सेतू सेवा केंद्रात शासकीय फी भरून नागर‍िक या व‍िव‍िध दाखल्यांसाठी घरबसल्या अर्ज करत असतात. किंवा नागर‍िक स्वत: आपले सरकार पोर्टलवर जाऊन या दाखल्यांसाठी अर्ज करू शकतात.

ज‍िल्ह्यात १ एप्रिल २०२३ ते ३ जानेवारी २०२४ या कालावधीत जात प्रमाणपत्र वगळता इतर सर्व कागदपत्रांसाठी ६१२५३७ जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी ५८१९०३ जणांना व‍िविध कागदपत्रांचे वाटप करण्यात आले. मागील नऊ मह‍िन्यात दररोजचे सरासरी २१५५ प्रमाणपत्रांचे ज‍िल्ह्यातून व‍ितरण होत आहे. यात सर्वाध‍िक २९५५७८ उत्पन्न दाखल्याचे व‍ितरण झाले आहे. त्याखालोखाल सर्वसाधारण प्रत‍िज्ञापत्र १८९६२९ , वय – राष्ट्रीयत्व व अध‍िवास प्रमाणपत्र ५४४८१, नॉन क्रीम‍ील‍ीयर प्रमाणपत्र ३८६४९, रह‍िवास दाखला २००८, ऐपत प्रमाणपत्र ७०६, शेतकरी दाखला ६७३, अल्पभूधारक दाखला ९१, भूम‍िहीन प्रमाणपत्र ३६, ज्येष्ठ नागर‍िक प्रमाणपत्र ३६, तहसील कार्यालयाचे सर्टीफाईड प्रमाणपत्र १४, डोंगरी प्रमाणपत्र २ जणांना वाटप करण्यात आले आहेत.

*मागील सहा वर्षात ४ लाख ८३ हजार १३ जात प्रमाणपत्रांचे वाटप*

ज‍िल्ह्यात महसूल प्रशासनाच्या उपव‍िभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून २०१८-१९ या आर्थ‍िक वर्षापासून ते ३१ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत ४०८४१३ जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. सन २०२२-२३ या‌वर्षातील १२ महिन्यात ९५४३३ जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. दररोज सरासरी २६१ जात प्रमाणपत्रांचे वाटप केले जात होते. यावर्षी १ एप्रिल २०२३ ते ३१ ऑक्टोंबर २०२३ या ७ महिन्यांच्या कालावधीतच ८२८९६ जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. या सात मह‍िन्यांच्या कालावधीत दररोजचे सरासरी ३९४ जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.

“महसूल प्रशासनाने जलदपणे काम करत नागर‍िकांना वेळेत घरबसल्या ऑनलाईन पध्दतीने कागदपत्रे उपलब्ध करून द‍िली आहेत. त्यामुळे नागर‍िकांना शासकीय कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची गरज पडत नाही. एका क्ल‍िकवर त्यांना कागदपत्र उपलब्ध झाली आहेत. या कागदपत्रांचा नागर‍िकांना पुढील शैक्षण‍िक, नोकरी व वैयक्तीक कामांना फायदा होणार आहे.” अशी प्रत‍िक्रीया ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद यांनी द‍िली आहे.
00000000000

बातमी शेअर करा..!
Previous Post

तरुणांसाठी नोकरीची उत्तम संधी!! या विभागात सुरूय बंपर भरती

Next Post

महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला : कोणाला किती जागा?

Next Post
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला? कोणाला किती जागा मिळणार? पहा

महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला : कोणाला किती जागा?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
वंदे ‘भारत ट्रेन’ची सेवा लवकरच जळगावकरांच्या सेवेत; असे आहेत प्रस्तावित वेळापत्रक?

नागपूर-पुणे वंदे भारतचे वेळापत्रक आले ; या स्थानकांवर असेल थांबा?

August 7, 2025
एसटी महामंडळात १०वी पास तरुणांसाठी खुशखबर! आजच करा अर्ज

एसटी महामंडळात १०वी पास तरुणांसाठी खुशखबर! आजच करा अर्ज

August 7, 2025
उतराखंडमध्ये अडकलेल्या जळगावच्या भाविकांना परत आणण्यासाठी पालकमंत्र्यांचा दिल्लीत पाठपुरावा

उतराखंडमध्ये अडकलेल्या जळगावच्या भाविकांना परत आणण्यासाठी पालकमंत्र्यांचा दिल्लीत पाठपुरावा

August 7, 2025
२५% टॅरिफचा फटका! ट्रम्पच्या निर्णयामुळे भारतात कोणत्या वस्तू महाग आणि कोणत्या स्वस्त होतील? जाणून घ्या

ट्रम्पचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर आता ५०% कर भरावा लागणार

August 7, 2025

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page