धुळे । सध्या उत्तरेकडून येणाऱ्या थंडी वाऱ्यामुळे जम्मू काश्मीर,मानालीपेक्षाही खान्देशासह महाराष्ट्रामधील अनेक काही ठिकाणी तापमानात कमालीची घट झालीय. अनेक जिल्ह्याचा पारा १० अंशाच्या खाली घसरल्याने हुडहुडी वाढली आहे. थंडी वाढल्यामुळे कपाटातील गरम कपडे बाहेर काढण्यात आलेत. ठिकठिकाणी शेकोट्या पेटवण्यात आल्या आहेत.
धुळ्याचा पारा मागील तीन दिवसांपासून पाच अंशाच्या आसपास राहिलाय. धुळे येथील कृषी महाविद्यालयात सलग दुसऱ्या दिवशी राज्याचे हंगामातील नीचांकी ४ अंश तापमान नोंदले गेले. राज्यात तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता कायम आहे.
राज्यात कुठे किती तापमान?
जळगाव – ८. ४° सेल्सिअस
धुळे – 5° सेल्सिअस
परभणी – 6.1° सेल्सिअस
दापोली – 7.8 ° सेल्सिअस
यवतमाळ – १०° सेल्सिअस
नांदेड 11° सेल्सिअस
अमरावती – 13°सेल्सियस
सोलापूर -14 ° सेल्सिअस
पालघर – 19 ° सेल्सियस
धुळ्यात तापमानाचा पारा पाच अंश सेल्सिअसवर
धुळ्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात घसरला आहे, आज धुळ्यामध्ये 5 आऊंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे, काल धुळ्यात 4 आऊंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती
जळगावातही तापमानाचा पारा ९ अंशाखाली
जळगाव जिल्ह्यात देखील मागील तीन दिवसापासून तापमानाचा पारा ९ अंशाखाली आली. यामुळे सध्या जळगावात थंडीचा कडाका वाढला आहे. आगामी तीन दिवस आणखी थंडीत वाढ होण्याचा अंदाज आहे.















Discussion about this post