मुंबई । वाहनधारकांना धक्का देणारी एक बातमी आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या नियमानुसार, टोल दर दरवर्षी 1 एप्रिल रोजी बदलले जातात. यंदा 3% वाढ जाहीर करण्यात आली असून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू होतील. यामुळे प्रवाशांच्या खिशाला चांगलीच झळ बसण्याची शक्यता आहे.
चारचाकी आणि इतर वाहनांसाठी नवे टोल दर
चारचाकी वाहनांसाठी:
एकेरी प्रवास: 5 रुपये वाढ (सध्याच्या दरावर)
परतीचा प्रवास: 10 रुपये वाढ
इतर वाहनांसाठी: 15 ते 20 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता
टोल दरवाढीमागचे कारण काय?
NHAI आणि MSRDC च्या नियमानुसार, टोल दर दरवर्षी वाढवले जातात. पायाभूत सुविधा, महामार्ग देखभाल आणि नवीन प्रकल्पांसाठी हा वाढीव शुल्काचा वापर केला जातो. यंदाच्या वाढीमुळे प्रवाशांच्या खिशाला फटका बसणार असून वाहतूक व्यावसायिकांवरही आर्थिक भार वाढणार आहे.
प्रवाशांना मोठा भुर्दंड!
प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी आता वाढीव टोलच्या तयारीत राहावे लागणार आहे. नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही दरवाढ मोठी असणार आहे.
Discussion about this post