मुंबई । कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सध्या राज्यात जोरदार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांसह घरांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान आज देखील महाराष्ट्रात मोठा अंदाज वर्तवला भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
या भागांना अलर्ट
उत्तर कोकण आणि घाटमाथ्यावर भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मध्य महाराष्ट्रमध्ये आजही विजांच्या कडकडाटासह पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. तर उत्तर महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. यात खान्देशातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आहे.
दरम्यान जळगाव जिल्ह्याला आज हवामान खात्याकडून कोणताही अलर्ट जारी करण्यात आला नाहीय. मात्र दुपारनंतर जिल्ह्यातील काही ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज आहे. मागच्या दोन दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं असून अनेक धरणातुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
महाराष्ट्रात आज कुठे कोणता अलर्ट ?
ऑरेंज अलर्ट: मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, पुणे
यलो अलर्ट : नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग















Discussion about this post