जळगाव | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025 ची अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षेची अंतरिम उत्तरसूची 19 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या परिक्षेच्या पेपर क्रमांक 1 व 2 मधील प्रश्न किंवा पर्यायी उत्तरांबाबत आक्षेप असल्यास 27 डिसेंबर 2025 पर्यंत लेखी निवेदन सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
विहित मुदतीत प्राप्त झालेल्या सर्व आक्षेपांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली असून, आता कोणतेही निवेदन किंवा आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत, असे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.
या अंतिम उत्तरसूचीनुसार MAHATET 2025 परीक्षेचा निकाल लवकरच परिषदेकडील अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून, संबंधित परीक्षार्थींनी याची नोंद घ्यावी, असे आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.















Discussion about this post