जळगाव | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम उत्तरसूची दि. 11 डिसेंबर रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. या परीक्षेच्या पेपर क्रमांक । व पेपर क्रमांक 2 च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे दि. 16 डिसेंबर अखेरपर्यंत पाठविणेबाबत उमेदवारांना कळविण्यात आले होते.
विहित मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेवून अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात आली आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन/आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच या अंतिम उत्तरसूचीनुसार MAHATET 2024 परीक्षेचा निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याचीही संबंधित परीक्षार्थीनी नोंद घ्यावी. असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. **
Discussion about this post