मुंबई । राज्यातील तापमानात बदल पाहायला मिळत आहे. एकीकडे काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढणार आहेत तर दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात आजापासून पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर पुढील २४ तासांमध्ये बीड, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे, असा अंदाज आयएमडीने वर्तविला आहे.
या जिल्ह्यात पावसाचा इशारा
यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. लातूर, नांदेड, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर सोलापूर, चंद्रपूर, अकोला, वर्धा, गडचिरोली, ब्रम्हपुरी, अमरावती, परभणी, वाशीम आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ४३ अंशापेक्षा जास्त होतं.
राज्यात पुढील दोन दिवस तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे. उष्माघाताच्या रुग्णांमध्ये देखील वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचं आवाहन आयएमडीने केलं आहे. पुढील २४ तासांमध्ये बीड, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे, असा अंदाज आयएमडीने वर्तविला आहे.
राज्यात या आठवड्यात देखील उकाडा कायम आहे. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये वादळी पावसाला पोषक हवामान होतंय. आज मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. अवकाळीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं आहे. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि उन्हाचा कडाका असं दुहेरी हवामान सध्या राज्यात अनुभवायला मिळत आहे.
Discussion about this post