मुंबई । राज्यातील तापमानात मोठी वाढ झाल्यामुळे उन्हाचा चटका वाढला आहे. अनेक ठिकाणी पारा चाळीशीच्या पुढे गेला आहे. त्यातच राज्यातील तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. परंतु राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तिवली जात आहे.
28 मार्चनंतर राज्यात वातावरण ढगाळ राहणार आहे. तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यात प्रामुख्याने चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटांपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
हवामानातील बदलामुळे या आठवड्यात राज्यातील अनेक शहरांचे तापमान ४० अंश सेल्सिअसवर जाणार आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात आताच तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. यंदा देशात मार्च आणि एप्रिल महिना सर्वात जास्त उष्णतेचा असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
एकीकडे तापमानात वाढत असताना हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. तेथे गडगडाटी वादळासह गारपीट होण्याचा दाट अंदाज वर्तविला जात आहे. अवकाळी पुन्हा एकदा हजेरी लावणार असल्याचं चित्र आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात उष्णतेच्या लाटांपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.















Discussion about this post