Monday, March 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

कॉपी प्रकरणात राज्यभरात मोठी कारवाई ; 81 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या निलंबनाने खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 9, 2026
in महाराष्ट्र
0
महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ ; अशी आहे वाढीव शुल्क आकारणी
बातमी शेअर करा..!

इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षांदरम्यान यंदा केंद्रांवर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेमुळे मास कॉपीचे प्रकार उघडकीस येत आहेत. या घटनांमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळून आल्याने राज्यभरात आतापर्यंत 81 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती राज्य मंडळाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारावीच्या परीक्षेदरम्यान बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात केंद्र क्रमांक 224 येथे कॉपीचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणात प्रशासनाने 17 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित केले आहे. विशेष म्हणजे परीक्षेच्या पहिल्याच दिवशी, 10 फेब्रुवारी रोजी हा प्रकार उघड झाला.

तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय, जैतापूर येथे केंद्र क्रमांक 0079 वर सामूहिक कॉपी होत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले. यात पर्यवेक्षक आणि केंद्र संचालक यांच्यासह काही जण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे 24 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 21 जणांना निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान, जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील काही केंद्रांवर इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान विद्यार्थ्यांकडून कॉपी केल्याचे आढळून आले. याप्रकरणी संबंधित विद्यार्थ्यांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात आली असून पर्यवेक्षक म्हणून नियुक्त पाच शिक्षकांवरही कारवाई करण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील एका केंद्रावर राज्यशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये मायक्रोनोट तसेच चॅट जीपीटीचे प्रिंटआउट वापरून सामूहिक कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी तीन शिक्षक आणि एका शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, परीक्षांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी आणि गैरप्रकारांवर लगाम घालण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेचा वापर अधिक कडक करण्यात येणार असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन ; कसा कराल अर्ज?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ ; अशी आहे वाढीव शुल्क आकारणी

कॉपी प्रकरणात राज्यभरात मोठी कारवाई ; 81 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या निलंबनाने खळबळ

March 9, 2026
उत्कृष्ट कार्य करणार्‍या माजी सैनिकांना विशेष गौरव पुरस्कार

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन ; कसा कराल अर्ज?

March 9, 2026
बांभोरीत चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

धरणगावात बंद घर फोडून चोरट्यांनी लांबविला २.७० लाखांचा ऐवज

March 9, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबलची आत्महत्या ; पोलीस दलात खळबळ

जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबलची आत्महत्या ; पोलीस दलात खळबळ

March 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page