महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत मोठी पदभरती सुरु असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. विशेष पदवी पास तरुणांना सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे.
एकूण ७५ रिक्त जागांसाठी भरती ही जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १९ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०२४ आहे.
ट्रेनी ज्युनिअर आणि ट्रेनी असोसिएट पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. ७५ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेतील या भरतीसाठी ट्रेनी ज्युनिअर ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ११७० रुपये फी भरायची आहे तर ट्रेनी असोसिएट पदासाठी ११८० रुपये शुल्क भरायचे आहे. २१ ते ३२ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. तुम्ही www.mscbank.com या वेबसाइटवर जाऊन अधिक माहिती वाचू शकतात.
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Apply Online |