१०वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात काही रिक्त पदासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ६८ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
कोणती पदे भरण्यात येणार?
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात लिपिक, सहाय्यक, शिपाई आणि इलेक्ट्रिशियन पदासाठी रिक्त जागा आहेत. या नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
पात्रता काय?
लिपिक, सहाय्यक, शिपाई पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी पास किंवा आयटीआय पदवी प्राप्त असणे गरजेचे आहे. याचसोबत डिप्लोमा झालेले उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. नुकतेच शिक्षण झालेल्या तरुणांसाठी ही नोकरीची संधी आहे. या नोकरीच्या कालावधीत तुम्हाला अनेक गोष्टी शिकता येणार आहेत. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
याचसोबत सध्या इंडियन ओव्हसीज बँक, यूनियन बँकेत विविध पदांसाठी भरती सुरु आहे. त्याचसोबत सणासुदीच्या दिवसात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे. सणासुदीच्या काळात ग्राहक जास्त प्रमाणात वस्तूंची खरेदी करतात. त्यामुळेच जास्त कामगारांची गरज भासते. तसेच अनेक डिलिव्हरी अॅप्सना डिलिव्हरी बॉयची गरज असते. त्यामुळे या काळात हंगामी कर्मचाऱ्यांची भरती केली जाते. त्यामुळे तुमच्यासाठी नोकरीच्या अनेक संधी येत्या काही दिवसात उपलब्ध होणार आहेत.
Discussion about this post