महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता १२ वीचा (12th result) निकाल ५ मे २०२५ रोजी जाहीर करण्यात आला. या निकालानंतर आता सर्वांचे लक्ष १० वीच्या निकालाकडे लागले आहे. विद्यार्थी आणि पालक दोघेही दहावीच्या निकालाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. (SSC Result 2025)
१२ वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच १० वीचा निकाल (SSC Result 2025) जाहीर होतो, हा गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे दहावीचा निकाल १५ मे २०२५ पूर्वी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अद्याप मंडळाकडून कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
परीक्षेची माहिती आणि संभाव्य निकालाची तारीख :
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षा यंदा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ दरम्यान झाली. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन ३ ते २० फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात आले. त्यामुळे पेपर तपासणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची शक्यता आहे.
शिक्षण मंडळाकडून संकेत देण्यात आले आहेत की निकाल जाहीर करण्याआधी अधिकृत वेबसाईटवर यासंदर्भात माहिती प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी mahresult.nic.in या संकेतस्थळावर नियमितपणे भेट देत राहणे गरजेचे आहे.
कुठे आणि कसा पाहता येईल निकाल? :
mahresult.nic.in
www.mahahsscboard.in
mahahsscboard.org
hscresult.mkcl.org
निकाल पाहण्यासाठी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर “SSC Result 2025” या लिंकवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपला रोल नंबर आणि आईचे नाव टाकून निकाल पाहता येईल. सबमिट करताच निकाल स्क्रीनवर दिसेल आणि तो प्रिंट किंवा डाऊनलोड सुद्धा करता येईल.
Discussion about this post