राज्यात गेल्या काही दिवसांपासून सक्रीय असणाऱ्या पावसाने ब्रेक घेतला आहे. कुठेही मुसळधार पावसाचा अंदाज नाहीय. एकीकडे पावसाने ब्रेक घेताच दुसरीकडे उकाड्यात वाढ झाली आहे. यामुळे आता राज्यात पाऊस कधी सक्रिय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागणार आहे. दरम्यान हवामान खात्याने 20 जुलैनंतर राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यात आज हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
पाऊस का घेणार ब्रेक?
प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात 17 जुलैपर्यंत पाऊस नसणार आहे. त्यानंतर जुलैच्या तिसर्या आठवड्यापासून पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे. सध्या अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकणारे मान्सून वारे कमकुवत झाले आहे. मान्सूनच्या पश्चिमी टोकाचेही काहीसे उत्तरेकडे सरकला आहे. बंगालच्या उपसागरात हवेचा दाब जुलै महिन्याच्या तिसर्या आठवड्यात अनुकूल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. राज्यात चार दिवस ऑरेंज आणि रेल अलर्ट कुठेही दिला नाही.
दरम्यान राज्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरण्या देखील झाल्या आहेत. राज्यात जवळपास ९० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. पावसाच्या ब्रेक कालावधीत मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. राज्यात यंदा गत वर्षीपेक्षा जास्त पेरणी झाली आहे. यंदा 2 लाख 78 हजार 345 हेक्टर क्षेत्रावर अधिक पेरा झाला आहे. गेल्या वर्षी 1,94,827 हेक्टरवर पेरणी झाली होती.















Discussion about this post