मुंबई । यंदा जूनमध्येच मान्सूनने देशातील बहुतांश भाग व्यापला आहे. यातच हवामान खात्याने आज महाराष्ट्रासह देशभरातील २६ राज्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहणं गरजेचं आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसानं अनेक राज्यांना झोडपून काढलं आहे. आयएमडीने दिलेल्या इशाऱ्यानुसार, आसाम, मेघालय, मध्य प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेट, अरूणाचल प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, झारखंड, गोवा, महाराष्ट्र, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या २६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल आहे.
अतिवृष्टीमुळे होणाऱ्या संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन आयएमडीने दिले आहेत. रहिवाशांना घरातच राहण्याचा, पूर येण्याची शक्यता असलेल्या भागात प्रवास करणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. असुरक्षित भागात भूस्खलन आणि अचानक पूर येण्याचा इशाराही आयएमडीने दिला आहे. दरम्यान, उत्तर भारतात मान्सूनच्या आगमनाने बऱ्याच काळापासून कडक उन्हाचा सामना करणाऱ्या राज्यांनाही दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्रातील या जिल्ह्याना अलर्ट
महाराष्ट्रातील पुणे, रायगड, सातारा, नाशिक, मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पावसासोबत जोरदार वारे, धुळीचे वादळ, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
Discussion about this post