पुणे । राज्यात थंडीचं प्रमाण हळूहळू कमी होत असून अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढला. यामुळे उन्हाचे चटके बसू लागले आहेत. तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज आहे.
पावसाला पोषक असं वातावरण तिथे राहिल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात आजपासून ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तर ९ फेब्रुवारीलाहलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पूर्व विदर्भापासून तेलंगण, कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान होत आहे.
तापमानात वाढ
पुणे, कोल्हापूर, सांगली, अकोला, वाशीम, यवतमाळ यथे तापमानाचा पारा ३५ अंशांच्या वर आला आहे. किमान तापमानाचा पारा ११ ते २२ अंशांच्या दरम्यान असून, थंडी कमी झाली आहे. आज देखील तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी-अधिक होत आहे. दिल्लीत थंड वाऱ्यांमुळे थंडी कायम आहे. दिवसा ऊन आणि हलक्या पावसाचीही शक्यता आहे. थंड वाऱ्यांमुळे थंडी वाढली असली तरी दिल्ली-एनसीआरमधील नागरिकांना प्रदूषणापासून मोठा दिलासा मिळाला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह डोंगराळ राज्यांमध्ये झालेल्या हिमवृष्टीमुळे उत्तर भारतात बर्फाळ वारे वाहत आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब आणि हरियाणामध्ये थंडी कायम राहणार आहे.
Discussion about this post