पुणे । राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचं संकट कायम असून मात्र दुसरीकडे काही भागात आज उष्णता वाढणार आहेत. त्यामुळे राज्यावर सध्या दुहेरी संकट आल्याचे दिसत आहे. आज मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रातील काही भागात गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हीच परिस्थिती 24 मेपर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.
या भागात पाऊस पडणार
IMD ने दिलेल्या माहितीनुसार आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. या काळात वादळी वाराही वाहण्याची शक्यता आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. खासकरुन फळबागांचे वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
या जिल्ह्यांना येलो अलर्ट
हवामान विभागाने आज विदर्भ आणि मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातही पाऊस पडण्याची शक्ययता आहे.
24 मे पर्यंत पावसाचा इशारा
हवामान विभागाने येत्या 24 मे राज्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याची माहिती दिली आहे. या काळात अकोला, अमरावती, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह वादळी वारा वाहण्याची गारपीटीची शक्यता आहे.
Discussion about this post