मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसनेत केलेल्या बंडाला वर्ष होत नाही तोवर अजित पवार यांनी बंड करून शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहे. राज्याच्या राजकारणात हे दोन मोठे भूकंप झालेले असतानाच आता तिसरा भूकंपही होणार असल्याची शक्यता आहे.
राज्यात आता कोणता नवीन भूकंप होणार याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीच हा दावा केला आहे. मीडियाशी संवाद साधताना चव्हाण यांनी हा दावा केल्याने खळबळ उडाली आहे
36 पेक्षा जास्त आमदार जर दुसऱ्या गटात आहेत हे सिद्ध झाल्यास अजितदादाच्या गटाला दुसऱ्या पक्षात विलीन व्हाव लागेल. तसं झालं तरच त्यांचं निलंबन रद्द होईल असं कायदा सांगतो. आतापर्यंत फुटीर गटाकडे 36 आमदारही दिसत नाहीत. काही आमदार अटी टाकून त्यांच्याकडे येत आहेत. पक्षाच्या अध्यक्षांनी नऊ मंत्र्यांचं निलंबन केलंय.
मग विधानसभा अध्यक्ष कशाची वाट पाहत आहे? असा सवाल करतानाच हा संपूर्ण पक्षपातीपणा आहे. अजितदादा गटाकडे 36 आमदारांचं संख्याबळ झालं नाहीत तर पुन्हा मोठा भूकंप होणार आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
Discussion about this post