राज्यातील विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर होणार आहेत, पण त्याआधीच राज्यातील राजकीय समीकरणं बदलू लागली आहे. विधानसभा निवडणुकीआधी अनेक नेते पक्षांतर करत आहेत. यातच भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते रवी लांडगे हे भाजपला रामराम ठोकून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. २० ऑगस्ट रोजी मातोश्रीवर त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचं समजतेय.
रवी लांडगे यांची राजकीय पार्श्वभूमी जुनीच आहे. त्यांचे चुलते आणि वडील हेही राजकारणात सक्रीय होते. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत त्यांनी महत्वाचे पदे भूषावली आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे,त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का मानला जातोय. पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपचे माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे यांचे पुतणे आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दिवंगत बाबासाहेब लांडगे यांचे पुत्र रवी लांडगे यांनी अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी भाजपला रामराम ठोकलाय.
रवी लांडगे उद्या मुंबईत मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश होणार आहेत.
Discussion about this post