मुंबई । आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी आतापासून कंबर कसली आहे. एकीकडे भाजपला रोखण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. तर इंडिया आघाडीला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने एनडीएचं पुनरुज्जीवन केलं आहे. तर महाराष्ट्रात भाजपने शिंदे गट आणि अजितदादा गटाला सोबत घेऊन महायुती केली आहे. मात्र महायुतीला एक मोठा धक्का बसला आहे.
महायुतीच्या घटक पक्षाने महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या पक्षाने स्वबळावर निवडणुका लढणार असल्याची घोषणाही केली आहे.महादेव जानकर यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
युती सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्रीही होते. जानकर यांचा रासप हा महायुतीचा घटक पक्ष आहे. पण जानकर यांनी आता युतीतून बाहेर पडत असल्याचा निर्णय जाहीर करून महायुतीला पहिला धक्का दिला आहे. जानकर यांच्या पक्षाचा राज्यातील अनेक जिल्ह्यात प्रभाव आहे. दलित आणि धनगर समाजामध्ये जानकर यांच्या पक्षाची पाळंमुळं खोल रुजलेली आहे. त्यामुळे जानकर यांच्या निर्णयाचा महायुतीला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Discussion about this post