मुंबई : आजपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अजित पवार हे युती सरकारमध्ये सामी झाल्यानंतरचं हे पहिलं अधिवेशन आहे. या अधिविशेनात विविध मुद्दे गाजण्याची शक्यता आहे.
या दरम्यान, सत्ताधारी महत्वाचे प्रस्ताव ठेवण्याची शक्यता आहे. तर त्याला विरोधक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं असेल. या अधिवेशन काळात दहा मुद्दे महत्वाचे ठरतील.
या मुद्द्यांवर अधिवेशन गाजणार?
1. मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप
2. कृषी खात्याच्या बोगस धाडी
3. महसूल विभागातील बदल्यांचं प्रकरण
4. राज्यातील जातीय दंगली
5. महिलांवरील अत्याचार, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न
6. .अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा मुद्दा
7. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं अनुदान, शेतमालाला न मिळणार भाव
8. मुंबई पालिकेच्या ठेवींच्या उधळपट्टीचा आरोप
9. मुंबईतील काँक्रिट रस्त्यातील भ्रष्टाचाराचे आरोप
10. मुंबई-ठाण्यातील एलईडी लाईट सुशोभिकरणावरील खर्च
अधिवेशन काळात विविध मुद्दे गाजणार आहेत. मात्र तीन मुद्द्यांकडे अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा आहेत.
त्रिशूळ सरकाच्या अधिवेशनाची वैशिष्ट्ये
1. शिंदे- फडणवीसांसोबतच अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतरचं पहिलं अधिवेशन आहे.
2. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने सत्ताधाऱ्यांची ताकद वाढली आहे.
3. शिवसेनेनंतरच्या राष्ट्रवादीतील बंडखोरीमुळ विरोधी पक्षाची ताकद कमी झाली. त्यामुळे विरोधकांची कसोटी पाहणारं हे अधिवेशन आहे.
4. विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण? या बाबतचा पेच कायम आहे.
5. अजित पवार गट सत्ताधारी आणि विरोधकांच्या आसनव्यवस्थेचा नवा पेच निर्माण झाला आहे.
Discussion about this post