Saturday, March 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

उद्यापासून राज्याचं पावसाळी अधिवेशन ; विरोधकांकडून या मुद्द्यांवर अधिवेशन गाजण्याची चिन्हे

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 26, 2024
in महाराष्ट्र, राजकारण
0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत
बातमी शेअर करा..!

मुंबई | उद्या म्हणजेच गुरूवारपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत असून हे पावसाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. कारण लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळाल्याने महाविकास आघाडी जोशात असून त्यांच्या आक्रमणाला तोड देताना सत्ताधा-यांची कसोटी लागणार आहे.

मराठा आरक्षणात सगेसोयरेचा समावेश करणारी अधिसूचना जारी करण्याची झालेली मागणी, ५४ लाख कुणबी नोंदींबाबात श्वेतपत्रिका काढण्याच्या मागणीसाठी ओबीसींचे सुरू झालेले आंदोलन, शेतकरी कर्जमाफीची मागणी, घाटकोपर होर्डिंग दुर्घटना, पुण्यातील पोर्शे कार अपघात व ड्रग प्रकरण आदी विषय अधिवेशनात गाजण्याची चिन्हे आहेत.

पुण्यात सापडलेले अमली पदार्थांचे अड्डे, पोर्शे अपघात प्रकरण, घाटकोपरमध्ये महाकाय फलक कोसळून झालेले दुर्दैवी मृत्यू, पावसात खंड पडल्याने राज्याच्या विविध भागांत निर्माण झालेली परिस्थिती, शेतक-यांचे प्रश्न, राज्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यस्थेची स्थिती आदी मुद्यांवरून सरकारला घेरण्याची रणनिती विरोधी पक्षाने आखली आहे. कापूस, सोयाबीनचे कोसळलेले भाव, कांदा प्रश्नावर सरकारने केलेली पोकळ घोषणाबाजी, शेतकरी कर्जमाफी, दूधाचे दर, शक्तीपीठ महामार्गाला शेतक-यांचा विरोध, लांबलेला पाऊस व दुष्काळ सदृश्य परिस्थिती अशा विविध मुद्यांवर विरोधक घेरणार असल्यामुळे सरकारचा कस लागणार आहे.

अशातच महायुतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गळचेपी होत असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आरोप झाल्याने सरकारमधील बेबनाव समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला एकसंधपणे सामोरे जाण्याचे आव्हान सत्ताधारी पक्षसमोर आहे.

२८ तारखेला अर्थसंकल्प
लोकसभा निवडणुकीमुळे फेब्रुवारी-मार्च महिन्यात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले होते. या अधिवेशनात १ एप्रिल २०२४ ते ३१ जुलै २०१४ या ४ महिन्यांच्या खर्चाला मान्यता देण्यासाठी सरकारने सन २०२४-२५ या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. आता या अधिवेशनात अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. अधिवेशनच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या व आर्थिक पहाणी अहवाल सादर होईल तर २८ जून अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होईल. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक सरकारकडून राज्यातील जनतेला खूश करणा-या घोषणा केल्या जातात. यामुळे या अधिवेशनात शेतकरी, महिला, युवक, कामगार तसेच विविध दुर्बल घटकांसाठी योजनांची जंत्री मांडली जाण्याची शक्यता आहे.

सरकारच्या नव्या कल्याणकारी योजना कोणत्या असतील, याकडे राज्यातील जनतेप्रमाणे विरोधी पक्षाचे लक्ष लागले आहे. यामुळे सत्ताधारी घेऊन जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी हे अधिवेशन म्हणजे शिंदे सरकारसाठी शेवटची संधी आहे. सरकार ही संधी कशी साधणार याची झलक सन २०२४-२५ या वर्षीच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात दिसणार आहे. लोकसभा निवडणुकीत शेतकरी, मराठा, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक हा मोठा समाज महायुती सरकारच्या विरोधात गेला त्यामुळे या घटकांना आकर्षित करणा-या घोषणा अतिरिक्त अर्थसंकल्पात अपेक्षित आहेत. विधानसभा निवडणूक लक्षात घेता अर्थसंकल्पात घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस पडणार हे निश्चित.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ओम बिर्ला यांचे अभिनंदन, पण.. ; राहुल गांधींच्या भाषणाने अनेकांच्या भुवया उंचावल्या

Next Post

जळगाव जिल्ह्यातील या तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
12वी पाससाठी खुशखबर! जळगाव पोलीस विभागामार्फत ‘पोलीस शिपाई’ पदांसाठी भरती जाहीर

जळगाव जिल्ह्यातील या तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठ्या उसळीनंतर आज सोने-चांदीच्या किंमती पुन्हा घसरल्या; जाणून घ्या नवीन दर..

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! सोन्याचे दर पुन्हा घसरले, वाचा जळगाव सुवर्णनगरीतील ताजे दर

March 14, 2026
राज्य सरकारच्यावतीने गॅस वितरणाबाबत कडक नियमावली जारी ; वाचा काय आहेत?

राज्य सरकारच्यावतीने गॅस वितरणाबाबत कडक नियमावली जारी ; वाचा काय आहेत?

March 14, 2026
२१ वर्षांची प्रतीक्षा संपणार ! महाराष्ट्रात ३० हजार शिक्षकेतर पदांसाठी भरती होणार

२१ वर्षांची प्रतीक्षा संपणार ! महाराष्ट्रात ३० हजार शिक्षकेतर पदांसाठी भरती होणार

March 14, 2026
येत्या १ एप्रिलपासून महामार्गांवरील प्रवास महागणार ; ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार टोल टॅक्स ?

खिशावरचा भार वाढणार ! 1 एप्रिल वार्षिक टोल पास ‘इतक्या’ रुपयांना मिळणार

March 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page