मुंबई : यंदा मान्सूनचा वेग हा गतवर्षीपेक्षा अधिक आहे. मान्सून केरळमध्ये दोन दिवस आधीच ३० मे रोजी दाखल झाला होता. त्यानंतर महाराष्ट्रात ८ जूनला दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती; परंतु यापूर्वीच दोन दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. याबाबतची माहिती पुणे विभागाचे विभागप्रमुख डॉ. के. एस होसाळीकर यांनी X पोस्टवरून दिली आहे.
महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
डॉ. होसाळीकर यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, “नैऋत्य मोसमी पावसाचे आज ( दि. ६ जून) महाराष्ट्रात आगमन झाले. तळकोकणातील रत्नागिरीमध्ये मान्सून सध्या दाखल झाला आहे.. त्यानंतर मेडक. भद्राचल, विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचला आहे.”















Discussion about this post