राज्याच्या तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील गट अ, ब आणि क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे.
या भरतीच्या माध्यमातून तब्बल 802 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने २ सप्टेंबर २०२३ ते २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात. सविस्तर जाहिरात वाचून त्याप्रमाणे विहित मुदतीत ऑनलाईन पध्दतीनेच आपले अर्ज सादर करायचे आहेत.
पद संख्या – 802 पदे
भरली जाणारी पदे खालील प्रमाणे
कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी), सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२), वीजतंत्री (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोडारी (श्रेणी-२), सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक व वीजतंत्री श्रेणी २ (ऑटोमोबाईल)
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु – 2 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 सप्टेंबर 2023
अर्ज फी –
1. खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी – रु.१,०००/-
2. मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग उमेदवारांसाठी – रु.१००/-
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई\
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
Discussion about this post