मुंबई । राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये महायुतीने मोठं यश मिळविले आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी भाजपने एकहाती सत्ता मिळविली आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेच्या महापौरपदी पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसणार आहे. मात्र आता महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
परंतु आरक्षण सोडत निघाल्यानंतरच महापौर पदाचा चेहरा ठरणार आहे. पुढील आठवड्यात नगर विकास खाते महापौर सोडत काढणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. तर जानेवारी अखेरीस महापौर निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे राज्यातील निवडणुकीच्या इतिहासात महापौर आरक्षणाची सोडत न होता निवडणूक होण्याची ही पहिलीच वेळ होती.
साधारणपणे महापालिका निवडणुकांपूर्वी किंवा प्रभाग रचनेदरम्यानच महापौरपदाचे आरक्षण जाहीर केले जाते. यामुळे कोणत्या प्रवर्गातील उमेदवाराला संधी मिळेल, हे स्पष्ट होत असे. मात्र, यावेळी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र हे आरक्षण पडण्यासाठी किमान दोन ते तीन आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.















Discussion about this post