मुंबई : राज्यातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) आहे. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आठवले गट आणि राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) या पाच पक्षांनी एकत्र येऊन मेळावा घेण्याचा निर्णय जाहीर केले आहे. परंतु महायुतीत पक्षांमध्ये रुसवे फुगवे सुरु झाले आहे.
महायुतीकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. मात्र महायुतीत मेळाव्यावर बहिष्कार टाकण्याचे आदेश रासपच्या वरिष्ठ स्तरावरुन मिळाले आहे. भाजप आणि रासप अध्यक्ष महादेव जानकर यांचे संबंध सध्या ताणले गेले आहे. यामुळे हा बहिष्कार टाकल्याची चर्चा सुरू आहे. महायुतीच्या मेळाव्याच्या बॅनरवर महादेव जानकर यांचा फोटो आहे.
भाजप आणि मित्रपक्षाकडून राज्यात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. यासाठी राज्यातील ४८ मतदार संघात मेळावे घेतले जात आहे. परंतु राज्यभरात महायुतीच्या मेळाव्यात सहभागी होवू नका, असे आदेश रासपच्या वरिष्ठ स्ततरावरून देण्यात आले आहे. महादेव जानकर महायुतीपासून वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.















Discussion about this post