तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत तब्बल ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील 1 हजार 846 जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
या जागांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. 9 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि वेळ असणार आहे. त्यासाठी शैक्षणिक अर्हता नेमकी काय, कोणाला अर्ज करता येणार आणि किती अर्जसोबत किती फी भरावी लागणार याची माहिती आपण यात पाहणार आहोत.
सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या लिंकवर या भरतीबाबत सविस्तर जाहिरात देण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ.अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली या भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील गट ‘क’ मधील रु. 25,500-81100 (पे मॅट्रिक्स-एम 15) अधिक अनुज्ञेय भत्ते या सुधारित
कार्यकारी सहायक (पूर्वीचे पटनाः लिपिक) या पदाची शैक्षणिक अर्हता
1) उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यममिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम
प्रयत्नात उत्तीर्ण असायला हवा.
(2) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असावा.
(3) ज्या मान्यताप्राप्त विद्यापिठाची सत्र पद्धत अवलंबली जात असेल त्या विद्यापीठातील उमेदवाराची टक्केवारी खालीलप्रमाणे गणण्यात येईल. सदर टक्केवारी 45% गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
खुला प्रवर्ग – खुल्या प्रवर्गासाठी वयाची मर्यादा 18 ते 38 वर्षे
मागास प्रवर्ग – मागास प्रवर्गासाठी वयोमर्यादा 18 ते 43 वर्षे
अर्ज करताना ऑनलाईन शुल्क
खुल्या प्रवर्गासाठी – 1000 रुपये (वस्तू व सेवा करासह)
मागास प्रवर्गासाठी – 900 रुपये (वस्तू व सेवा करासह)
उमेदवाराने अर्ज भरल्याने हे परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परत दिले जाणार नाही.















Discussion about this post