नागपूर । महायुतीला निवडणुकीत मिळालेल्या यशामागे लाडक्या बहिणींचा मोठा वाटा असल्याचं महायुतीच्या प्रमुख नेत्यांनीही जाहीरपणे सांगून टाकलंय. लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा होऊ लागले. जुलैमध्ये सुरुवात झाली. मात्र, काहींना पैसे मिळाले तर, काहींच्या बँक खात्यात आधार नंबर लिंक नसणं किंवा इतर केवायसीसंदर्भात अपडेट न झाल्यानं रक्कम जमा झाली नाही. पण लवकरच लाडक्या बहिंणीच्या खात्यात ९६०० रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.
निवडणूक काळात सत्ताधाऱ्यांनी लाडकी बहीणचे १५०० वरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. आता जर त्याला सरकारची मंजुरी मिळाली आणि २१०० रुपये मिळण्यास सुरुवात झाली तर, मागील पाच महिन्यांचे प्रत्येकी १५०० आणि चालू महिन्याचे २१०० असे एकूण ९६०० रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ शकतात.
या योजनेचा सप्टेंबर अखेरपर्यंत फॉर्म भरण्याची मुभा होती. नंतर फॉर्म भरण्याची मुदत संपली. ज्यांच्या खात्यात जुलैपासूनची रक्कम जमा झाली नाही, त्यांच्या खात्यात ७५०० हजार रक्कम जमा झाले. ज्याचा लाभ २ कोटी ३४ लाख महिलांना झाला.मात्र, अर्ज स्वीकारल्यानंतरही काही महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे अद्याप जमा झालेले नाहीत. अशा लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची आणि तितकीच आनंदाची माहिती आहे. ज्यांचे अर्ज मंजूर झाले, पण अद्याप खात्यात रक्कम जमा झाली नाही, त्यांच्या खात्यात डिसेंबरचा कदाचित वाढीव हप्त्याची रक्कम आणि मागील पाच महिन्यांचे १५०० रुपये असे एकूण ९६०० रुपये जमा होऊ शकतात. पण त्यासाठी सर्व अटींची पूर्तता झालेली असावी, याशिवाय सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे योजनेचे २१०० रुपयांना मंजुरी मिळायला हवी. तसं झालं नाही तर, आधीच्या तरतुदीनुसारच दरमहा १५०० रुपये मिळू शकतील.















Discussion about this post