राज्य शासनाच्या कृषी व पदूम विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. कृषी व पदूम विभागातील कृषी आयुक्तालय व अधिनस्त विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील सदर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक 13 जुलै 2023 पासून दिनांक 22 जुलै 2023 या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरतीद्वारे लघुटंकलेखक व गट-ब (अराजपत्रित) मधील लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत.
अर्ज शुल्क –
अमागास – रु.720/-
गासवर्गीय / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु. 650/-
वयोमर्यादा – 18 ते 45 वर्षे
शैक्षणिक अर्हता :
लघुटंकलेखक – माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
लघुलेखक (निम्न श्रेणी) – माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
लघुलेखक (उच्च श्रेणी) – माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
शुद्धिपत्रक – Krushi Vibhag Bharti 2023
PDF जाहिरात – Krushi Vibhag Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा – Maharashtra Agriculture Department Recruitment 2023
Discussion about this post