महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यातील एकूण 2384 केंद्रप्रमुख पदाच्या भरतीकरिता केंद्रप्रमुख भरती 2023 जाहीर केली आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार दिनांक 15 जून 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.
तब्बल 2384 रिक्त पदे भरली जातील. त्यामुळे पात्र उमेदवार मुदतीपूर्व अर्ज करून संधी मिळवू शकतात.
भरतीसाठी रिक्त पदाचे नाव : केंद्रप्रमुख
शैक्षणिक पात्रता : फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा., म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./ बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.
किंवा
प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे. त्या दिनांकापासून ३ वर्षांपेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे.
पगार : 41,800 – 1,32,300 रुपये प्रतिमहिना
वयाची अट : 50 वर्षे
परीक्षा फी :
सर्व संवर्गातील उमेदवार: रु.950/–
दिव्यांग उमेदवार: रु.850/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2023















Discussion about this post