मुंबई: राज्यात काही भागात अवकाळी पाऊस पडताना दिसत आहे तर काही भागात उन्हाचा चटका बसत आहे. याच हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसही राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
मात्र, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक भागांमध्ये पाऊस किंवा वीजांच्या गडगडाटासह पाऊस बरसू शकतो.
याशिवाय, पुणे, जळगाव, धुळे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना या 10 जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह वादळी वारे वाहू शकतात. उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहमदनगरमध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.















Discussion about this post