तुम्हीही सरकारी विभागात नोकरीचं स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणअंतर्गत भरती केली जाणार आहे. अ, ब आणि क संवर्गातील पदांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये एकूण २९० पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात लेखा परिक्षण अधिकारी, वरिष्ठ लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारीस उपलेखापाल, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ लिपिक/लिपिक नि टंकलेखक अशा पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ डिसेंबर २०२५ आहे.
शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे. यासाठी जाहिरात देण्यात आली आहे. लेखा परीक्षण अधिकारी पदासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे. याचसोबत १० वर्षांचा कामाचा अनुभव असावा, लेखा अधिकारी (गट ब)पदांसाठी कॉमर्समध्ये मास्टर्स डिग्री केलेली असावी. याचसोबत ५ वर्षांचा अनुभव असावा.सहाय्यक लेखा अधिकारी (गट ब) पदासाठीही डिग्री प्राप्क प्राप्त केलेली असावी. अभियंता पदासाठी संबंधित विषयात इंजिनियरिंग केलेले असावे.
पगार
या नोकरीसाठी निवड झाल्यावर पदानुसार पगार वेगवेगळा मिळणार आहे. लेखा परीक्षण अधिकारी (गट अ) पदासाठी ५६१०० ते १७७५०० रुपये पगार मिळणार आहे. लेखा अधिकारी गट ब पदासाठी ४१८०० ते १३२३०० रुपये मिळणार आहे. सहाय्यक लेखा अधिकारी पदासाठी ३८,६०० ते १,२२८०० रुपये पगार मिळणार आहे.पगार हा पदानुसार वेगवेगळा असणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला १९ डिसेंबरपूर्वी अर्ज करायचे आहेत.















Discussion about this post