मुंबई : राज्यातील शिंदे सरकारने आज चार आयएएस अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. राज्यातील विविध विभागात कार्यरत असलेल्या आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी देण्यात आले आहेत. या आदेशात आयएएस अधिकारी सचिन्द्र प्रताप सिंह , राधाविनोद अरिबाम शर्मा, एस. राममूर्ती आणि अमन मित्तल यांच्या नावाचा सामावेश आहे.
राज्यातील 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
१) IAS सचिन्द्र प्रताप सिंह (2007) यांची यशदा, पुणे येथे अतिरिक्त महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२) IAS राधाबिनोद अरिबम शर्मा (2012) मुख्य प्रशासक, सिडको, छत्रपती संभाजी नगर यांची Jt.MC, MMRDA मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
३) IAS एस. राममूर्ती (2013) Jt.MC, MMRDA, मुंबई यांची सचिव, फी नियामक प्राधिकरण, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
४) IAS अमन मित्तल (2015) यांची व्यवस्थापकीय संचालक, MPCL, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
Discussion about this post