मुंबई । महाराष्ट्रातील शेतकरी ज्या घोषणेकडे आतुरतेने डोळे लावून बसला होता ती घोषणा अखेर राज्य सरकारने केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफीची योजना जाहीर केली. या कर्जमाफीच्या योजनेअंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे.
एवढंच नाही तर जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येईल अशी घोषणाही या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना कृषी आणि ग्रामीण विकासाला केंद्रस्थानी ठेवत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. राज्याच्या आर्थिक विकासासोबतच शेतकरी आणि ग्रामीण भागाला बळ देण्यावर या अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे.
30 सप्टेंबर 2025 रोजी पर्यंत मिळणार कर्जमाफी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचीही घोषणा केली. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकित असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी जाहीर करत आहे, असे ते म्हणाले.तसेच जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येईल अशी घोषणाही यावेळी करण्यात आली आहे.















Discussion about this post