मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली असून काँग्रेस देखील विधानसभा निवडणुकीसाठी अॅक्शन मोडवर आलं आहे. मात्र त्यापूर्वी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली घडण्याची शक्यता आहे. काँग्रेस काही विद्यमान आमदारांचं तिकीट कापून त्यांना घरचा रस्ता दाखवण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या. यावेळी काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं होतं. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्या आमदारांनी बंड केलं होतं, त्यांना डावलून नवीन लोकांना संधी देण्याचा मोठा निर्णय काँग्रेस नेत्यांनी घेतलाय.
दरम्यान, क्रॉस वोटिंग केलेल्या आमदारांमध्ये रावेरचे शिरीष चौधरी यांचं नाव देखील समोर आलं होते. नेमकं काँग्रेसन कोणाला घरचा रस्ता दाखविणार हे आगामी विधानसभा निवडणुकीत कळेल.
मात्र, विद्यमान आमदारांचं कामकाज पाहून काँग्रेस पक्ष विधानसभेच्या तिकीटाची वाटप करणार, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मतदारसंघात ज्यांचं काम चांगलं त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे यासाठी आमदारांच्या कामाचा अहवाल जमा करण्याचं काम काँग्रेसकडून सुरु आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही बदमाशाला तिकीट दिलं जाणार नाही, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.
Discussion about this post