मुंबई । मागच्या काही दिवसापासून राज्यातील तापमानात सातत्याने चढ-उतार सुरु आहे. बदलत्या वातावरणामुळे थंडीचा कडाकाही ओसरला असून मात्र आता पाकिस्तानकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. पुढील २४ तास तापमान कमी राहणार असून त्यानंतर वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
भारतातील ईशान्य मोसमी वाऱ्यांचा हंगाम संपल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान विभागानुसार, सोमवारी निफाड येथे ७.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गोंदिया येथे ९.८ अंश सेल्सिअस आणि धुळे येथे १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सोमवारी जळगावातील रात्रीचे किमान तापमान ११. ८ अंश तर दिवसाचे तापमान २८.४ अंश इतके होते.
आज राज्यात थंडी कमी होऊन राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामानासह उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्याच्या किमान तापमानात वाढ होत असल्याने गारठा कमी-अधिक होत आहे.















Discussion about this post