पुणे : महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहवीच्या परीक्षेचा निकाल आज , म्हणजेच 2 जून 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. परीक्षेचा निकाल लागणार असल्याचं शिक्षण विभागाने स्पष्ट केल्याने विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.
दरम्यान, आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन शिक्षण विभागाकडून राज्यातील निकालाची टक्केवारी जाहीर केली जाईल. तसेच किती विद्यार्थी आणि विद्यार्थीनी उत्तीर्ण झाले? राज्याचा एकूण निकाल किती लागला? परिमंडळ निहाय निकाल किती लागला? याची माहिती शिक्षण विभागाकडून दिली जाईल. त्यानंतर दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत होत आहे. यंदा 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 ने कमी झाली आहे.
निकाल कुठे चेक कराल?
mahresult.nic.in
sscresult.mkcl.org
ssc.mahresults.org.in
असा करा निकाल चेक
इयत्ता दहावीचा निकाल पाहण्यासाठी शिक्षण विभागाच्या mahresult.nic.in या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या.
त्यानंतर संकेतस्थळाच्या होमपेजवर Maharashtra Examination 2023 – RESULT च्या लिंकवर क्लिक करा
त्यानंतर SSC Examination February- 2023 RESULT लिंकवर क्लिक करा
त्यानंतर पुढच्या पानावर Roll Number आणि आईचं नाव टाका
निकाल लगेच स्क्रिनवर दिसेल
मार्कशीट चेक केल्यानंतर प्रिंट घ्या