पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा विद्यार्थी आणि पालकांना लागली आहे. अशातच निकालाबाबत एक मोठी अपडेट समोर आली असून विद्यार्थ्यांची आणि पालकांची प्रतीक्षा संपणार आहे. कारण दहावी आणि बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे.
कधी लागणार निकाल?
निकालासाठी बोर्डाकडून तयारी पूर्ण झाल्याचं सांगितले जात असल्यामुळे मे महिन्याच्या शेवटी बारावी आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावी परीक्षेच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
राज्यात २१ फेब्रुवारी ते २१ मार्चदरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. यंदा बारावीच्या परीक्षेला राज्यभरातून अंदाजे १५ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
Discussion about this post