मुंबई । राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशाच्या वर गेला आहे. यामुळे उन्हाचा चांगलाच चटका बसत आहे. एकीकडे उष्णतेचा कहर कायम असताना राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. विशेष जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
या भागात पावसाचा अंदाज
राज्यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, आणि कोकण विभागात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पाच एप्रिलपासून हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पाच ते आठ तारखेला मध्य महाराष्ट्रामध्ये, सहा ते आठ तारखेला कोकण गोवा आणि मराठवाड्यात, सात आणि आठ तारखेला विदर्भामध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जळगावातही पावसाचा अंदाज
दरम्यान, ५ एप्रिल पासून जळगाव जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे जळगावकरांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.
Discussion about this post