मुंबई । उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीमुळे धुक्याची चादर पसरली आहे. याचा परिणाम रेल्वे, रस्ते, विमान वाहतुकीवर दिसत आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे राज्यातील थंडीसाठी पोषक ठरत आहेत. एकीकडे राज्यासह देशात थंडीचा कडाका वाढला असताना राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात येत्या काही दिवसात थंडीचा जोर ओसणार असून पावसाची शक्यता
विदर्भात येत्या काही दिवसात हलक्या पावसाच्या सरी कोसळणार असल्याचं अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील काही दिवसात पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Discussion about this post