जळगाव । उन्हाच्या तडाख्याने राज्यातील नागरिक हैराण झाले असून दुसरीकडे राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे. अद्यापही अवकाळी पाऊस थांबता थांबत नाहीये. जळगाव जिल्ह्यात देखील आज काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात ढगांच्या गडगडाटासह तुरळक पाऊस झाला. दरम्यान, सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
राज्यातील या भागात गारपीटसह पावसाचा इशारा
हवामान विभागकडून विदर्भात आज आणि उद्या पावसासह गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. सकाळपासून आभाळ असून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ येथे गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
तसेच चंद्रपूर गडचिरोली, अकोला, बुलढाणा, वाशीम येथे वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दोन आठवड्यांपूर्वी सुद्धा अशाच पद्धतीने विदर्भात अनेक जिल्ह्यात गारपीट झाल्याने वातावरणात बदल पाहायला मिळाला होता.मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर उष्णतेचा तडाखा कायम असला तरी ठाणे, मुंबई आणि पुण्यातही पाऊस येण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज आहे. तसेच अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.















Discussion about this post